बसमधील गर्दीचा फायदा घेत जळगावात सव्वा लाखांचे दागिने लंपास


जळगाव : नवीन बसस्थानकात चोर्‍यांच्या घटना थांबायला तयार नाहीत. बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेचे एक लाख 12 हजारांचे दागिणे चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्नेहल अजीत तायडे (31) या बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगावात आल्यानंतर यावल येथे जाण्यासाठी त्या नवीन बसस्थानकातून जळगाव-यावल बसमध्ये बसल्या मात्र गर्दीचा फायदा घेत भामट्यांनी त्यांच्या पर्समधील एक लाख 12 हजारांचे दागिणे लांबवले. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्नेहल तायडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज बंकट हे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !