मोबाईलसह तरुणाची दुचाकी लांबवली : नशिराबाद बसस्थानकातील घटना
Youth’s bike stolen with mobile phone : incident at Nashirabad bus stand जळगाव : नशिराबाद बसस्थानकावरुन तरुणाचा मोबाईल व दुचाकी लांबवण्यात आली. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शिरसोली येथे करण अरुण बारी हा तरुण वास्तव्यास असून खाजगी नोकरदार आहे.
बसस्थानकावरून लांबवली दुचाकी
सोमवार, 8 मे रोजी करन हा दुचाकी (एम.एच. 19 डी.के. 0908) ने नशिराबाद बसस्थानकावर आला असता त्याने बसस्थानकावर दुचाकी लावल्यानंतर तो कामानिमित्त गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. दुचाकीच्या डिक्कीत मोबाईलही असल्याने चोरी प्रकरणी बुधवार, 10 मे रोजी करनने नशिराबाद पाोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहेत.


