जळगावातील वॉचमनचा हौदातून पाणी काढतांना बुडून मृत्यू
A watchman in Jalgaon drowned while drawing water from a well जळगाव : शहरातील मुंदडा हायस्कूलच्या वॉचमनचा हौदातून पाणी काढत असताना बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 12 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. किशोर दत्तात्रय चोधरी (42, मुंदडा हायस्कूल) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तोल जावून पडल्याने मृत्यू
शहरातील पिंप्राळा ीरीसरातील मुंदडा हायस्कुलमध्ये किशोर चौधरी हे गेल्याआठ वर्षांपासून पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शाळेतील वॉचमनचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किशोर हे शाळेच्या आवारात असलेल्या हौदातून पाणी काढण्यासाठी गेले असता त्याचा तोल जावून ते हौदात पडले व त्यांचा बुडून मृत्यू झाला.
पत्नी बघण्यासाठी गेल्यानंतर घटना उघडकीस
बराच वेळ झाला तरी किशोर हे पाणी घेवून आले नसल्याने ते त्यांना बघण्यासाठी त्यांच्या पत्नी हौदाजवळ गेल्या असता त्यांना आपले पती किशोर हे हौदात बुडालेले दिसून आले. त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर परीसरातील नागरीकांनी त्याठिकाणी धाव घेत किशोर चौधरी यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.


