जळगावातील निवृत्ती नगरात पेंटर व्यावसायीक तरुणाची आत्महत्या
A young man committed suicide by hanging himself in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील निवृत्तीनगरातील तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही शनिवार, 13 मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्यचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. हेमंत राजेंद्र चौधरी (34) असे आत्महत्या करणार्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मध्यरात्री घेतला गळफास
पेंटर व्यावसायीक हेमंत चौधरी हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह निवृत्ती नगरात वास्तव्याला होते. शुक्रवारी रात्री हेमंत चौधरी हे जेवण करून कुटूंबासोबत झोपले मात्र मध्यरात्री त्यांनी दोरीच्या सहाय्याने किचनमध्ये गळफास घेतला. हा प्रकार शनिवारी पहाटे पाच वाजता पत्नी गायत्री यांच्या लक्षात आल्याने त्यांनी टाहो फोडला. तरुणाने आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. नागरीकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत हेमंत यांच्या पश्चात पत्नी गायत्री, मुलगा प्रतीक (16) आणि मुलगी माही (8), आई मंगला, भाऊ विनोद आणि दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.


