शेतातील विहिरीतून पाणी काढताना तोल गेल्याने रवंजेतील युवकाचा मृत्यू


एरंडोल : शेतातील विहिरीतून पाणी काढताना तोल गेल्याने रवंजेतील युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. जितेंद्र गजमल पाटील (37) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तोल गेला अन जिवाला मुकला
रवंजे खुर्द येथील जितेंद्र गजमल पाटील हा युवक शनिवारी सकाळी आपल्या शेत गट क्रं. 166/4 मध्ये कामाला गेला असता तो शेतातील विहिरीतील पाणी काढत असतांना अचानक त्याचा तोल गेला व विहिरीत पडला. त्यास शेतातील मजुरांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले व एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. जितेंद्र हा घरातील मोठा व कमावता तरुण असल्याने त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, एक मुलगी, लहान भाऊ व बहिण असा परीवार आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला देविदास बापू पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जुबेर खाटीक हे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !