सावखेडा खुर्द शिवारात शेतात आग : सव्वा दोन लाखांचे नुकसान


जळगाव : विद्युत महावितरण कंपनीची वीज वाहक तार अचानक तुटून पडल्यानंतर शेतात आग लागल्याने केळीसह ठिबक नळ्या जळाल्याने सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सावखेडा खुर्द शिवारात शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

विजेची तार तुटताच लागली आग
जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे नामदेव यादव पाटील (70) हे वास्तव्यास आहेत. त्यांची सावखेडा खुर्द शिवारात गट नंबर 150 या ठिकाणी शेती आहे. शुक्रवारी या शेतावरून गेलेली महावितरणचे विजेची तार अचानक तुटून शेतात पडताच शेतात आग लागल्याने शेतातील उभ्या केळीचे पीक जळून खाक झाले तसेच शेतातील ठिबकच्या नळ्याही जळाल्या. या आगीमुळे एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. शेत मालक नामदेव यादव पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आगीची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !