जळगावात पुन्हा भरदिवसा धाडसी घरफोडी : 34 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला


Daring house burglary again in broad daylight in Jalgaon: 34 thousand stolen जळगाव : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम असून खोटेनगर परीसरातील हिराशिवा कॉलनीत महिलेचे बंद घर भर दुपारीच फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिन्यासह रोकड मिळून 33 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी शनिवारी रात्री 11 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरांना टार्गेट
जळगाव शहरातील खोटे नगर परीसरातील हिरा शिवा कॉलनीत नम्रता महावीर गादिया (50) या महिला परीवारासह वास्तव्याला आहेत. शनिवार.ी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नम्रता गादिया या मैत्रिणीच्या घरी जेवणासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घर बंद करून कुलूप लावलेले होते. या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच 10 हजारांची रोकड असा एकूण 33 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. दुपारी दोन वाजता नम्रता गादिया घरी आल्या त्यावेळेस त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !