पायी चालणार्या वृद्धेला दुचाकीने उडवले
An elderly woman who was walking was hit by a bike जळगाव : कानळदा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ पायी जाणार्या वृद्ध महिलेला मागून येणार्या दुचाकीने धडक दिल्याने वयोवृद्धा जखमी झाली. या प्रकरणी शनिवारी रात्री 11 वाजता शहर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
यशोदाबाई सुखदेव साकला (70, कानळदा रोड, शिवाजीनगर साईबाबा मंदिर, जळगाव) या वृध्दा शुक्रवार, 12 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दवाखान्यात जाण्यासाठी पायी जात असताना मागून येणारी दुचाकी (एम.एच.19 सी.ई.8524) ने जोरदार धडक दिल्याने यशोदाबाई यांच्या पायाला व कमरेला मुका मार बसला आहे. दुचाकीस्वार गणेश महाजन यांच्या विरोधात वृध्द महिलेच्या फिर्यादीवरून शनिवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला पोलीस नाईक स्वप्नाली सोनवणे करीत आहे


