इन्स्टाग्राम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : जळगावातील तरुणीचीइन्ट्राग्राम हॅक करीत तीन लाख 15 हजार लांबवले
A young woman in Jalgaon was cheated of three and a half lakhs जळगाव : सोशल मिडीयातील इन्स्टाग्राम हे अॅप हॅक करीत सायबर भामट्याने तरुणीच्या लॅपटॉपमध्ये शिरकाव करीत तरुणीच्या खात्यावरील तीन लाख 15 हजार रुपये वळते केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोशल मिडीया जपून वापरण्याचे आवाहन
जळगाव शहरातील प्रताप नगरात अनुजा श्रेयांश रायसोनी (29) ही तरुणी वास्तव्यास आहे. तिच्याकडील मोबाईलमधील इन्स्टाग्राम अॅप हॅक करीत सायबर भामट्याने लॅपटॉपचा ताबा घेवून पेटीएम वॉलेट व गुगल पे खात्याची माहितीचा डाटा चोरला व तरुणीच्या आयआसीआसीआय या तसेच एचडीएफसी या दोन्ही बँकेच्या खात्यावरून तब्बल तीन लाख 15 हजार रुपये आपल्या खात्यात वळते केले. फसवणूक झाल्याचा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर अनुजा हिने शनिवारी सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.


