म्हैसवाडीतील तरुणाचा अपघाती मृत्यू : आरोपी वाहन चालकाला अटक


Accidental death of youth in Mhaiswadi: Accused driver arrested यावल : बहिणीला भेटण्यासाठी जाणार्‍या म्हैसवाडीतील भीमराव प्रदीप पांडव (40, म्हैसवाडी, ता.यावल) या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना हिंगोणा गावाजवळील हिंगोणा-भालोद रस्त्यावर शुक्रवारी रात्री घडली होती. अपघात प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर बोलेरो चालकास फैजपूर पोलिसांनी अटक केली असून बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे.

वाहन चालाकाला अखेर अटक
शाहबाज शाह जाकीर शाह (हिंगोणा, ता.यावल) असे अटकेतील वाहन चालकाचे नाव आहे. भीमराव पांडव हा तरुण दुचाकी (एम.एच.19 ई.बी.4791)
मारूळ येथे बहिणीला भेटण्यासाठी जात असताना महेंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.6261) ने धडक दिल्याने भीमरावचा मृत्यू झाला होता, या प्रकरणी शनिवारी हिंगोणा पोलीस पाटील दिनेश जगन्नाथ बाविस्कर (46) यांनी फैजपूर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजेश बर्‍हाटे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !