घरी कुणी नसताना चहा विक्रेत्या तरुणाने घेतला गळफास : जळगावातील घटना
A young tea seller hanged himself when no one was at home: an incident in Jalgaon जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनीतील आकाश सुरेश शेरे (19) या चहा विक्री करणार्या तरुणाने घरी कुणी नसताना गळफास घेतला. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीला आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्रपरीवाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.
घरी येताच घेतला गळफास
आकाश शेरे हा आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत वास्तव्याला होता. आकाश हा एमआयडीसी परीसरात चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे सहा वाजता आकाशाने आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी अंघोळ करण्यासाठी घर गाठले व नंतर गळफास घेतला. आकाश हा टपरीवर का आला नाही हे पाहण्यासाठी आई सविता घरी आल्या असता त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच मोठा धक्का बसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणारे नागरीक व तरुणांनी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषित केले.
मयत तरुणाच्या पश्चात आई सविता, भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


