तु का माधुरी दीक्षित आहे का? म्हणत महिलेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा
रावेर :31 वर्षीय महिला कपडे धूत असताना ओट्याजवळ अचानक दोघे आल्यानंतर महिलेने संबंधिताना बाजूला व्हा, अन्यथा अंगावर पाणी उडेल, असे म्हटल्यानंतर संशयिताना राग आल्याने त्यांनी महिलेले तु का माधुरी दीक्षित आहे का म्हणत तिच्याशी वाद घालून तिचा विनयभंग केला. ही घटना रावेर तालुक्यातील रमजीपूर येथे बुधवारी दुपारी 12 वाजता घडली. या प्रकरणी संशयित युनूस सायबू तडवी व ईरफान नामदार तडवी (दोन्ही रा.रमजीपूर, ता.रावेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणयात आला असून संशयितांना अटक करण्यात आली.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
31 वर्षीय महिला रमजीपूर येथे वास्तव्यास असून बुधवार, 10 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास महिला घराच्या ओट्यावर कपडे धूत असताना युनूस सायबू तडवी व इरफान नामदार तडवी आले व ते बोलत असताना महिलेने त्यांना बाजूला व्हा, मी कपडे धूत असून तुमच्या अंगावर पाणी उडाल्यास तुम्ही मलाच उलट बोलाल, असे म्हटल्यानंतर युनूस याने महिलेकडे पाहून आता तर फक्त पाहत आहे, तू काय माधुरी दीक्षीत आहे काय, एक दिवस तुला उचलून घेवून जाईन, असे म्हणताच संशयित इरफान यानेही महिलेला उद्देशून त्याच्याशी होकार मिळवत एक दिवस तुला उचलून घेऊन जाऊ, असे म्हटत महिलेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करीत संशयितांनी हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारू, अशी धमकी दिली. महिलेने रविवारी रावेर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर संशयितांविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश सानप करीत आहेत.
