धरणगाव तालुका खुनाने हादरला : डोक्यात वीट मारल्याने तरुणाचा मृत्यू
Dharangaon taluka rocked by murder : Youth dies after being hit on the head with a brick धरणगाव : कौटुंबिक वादातून दाम्पत्यात टोकाचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी तरुण सरसावल्यानंतर त्याच्या डोक्यात आरोपीने वीट मारल्याने तरुणाचा मृत्यू ओढवल्याची घटना धरणगाव तालुक्यातील वराड बु.॥ येथे रविवारी रात्री नऊ वाजता. या प्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. बिसन भोडा नरगावे (40, करचोली, ता.सेंधवा) असे मयताचे नाव आहे.
डोक्यात वीट बसताच तरुणाचा मृत्यू
रविवार, 14 मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यात वराड बु.॥ गावातील रामजी ऑईल मिलजवळ नजरीया शुभाराम कुमारीया (35, रा.करचोली, ता.सेंधवा, मध्यप्रदेश, ह.मु.रामजी ऑईल मिलजवळ वराड बु.॥, ता.धरणगाव) याचे पत्नी बानुबाईसोबत भांडण सुरु होते. दाम्पत्य एकाच गावातील असल्याने तरुण बिसन याने वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी केली मात्र दारूच्या नशेत असलेल्या नजरीया याने आमच्या नवरा बायकोच्या भांडणात का बोलतो?, असे बोलून बिसनच्या डोक्यावर विटेने, तोंडावर व छातीवर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोटू भोडू नरगावे (करचोली, ता.सेंधवा) यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी नजरीया शुभाराम कुमारीया यास अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक प्रमोद आर.कठोरे करीत आहेत.


