धरणगावनजीक भरधाव दुचाकीच्या धडकेने चोपड्यातील तरुण ठार


A youth from Chopra was killed in a collision with a speeding bike near Dharangaon धरणगाव : चोपडा येथील तरुण लग्नात एरंडोल येथे वर्‍हाडींना फेटे बांधण्यासाठी गेल्यानंतर परतीच्या प्रवासात अपघातात ठार झाला. हा अपघात धरणगाव-चोपडा रस्त्यावरील पिंपळे फाट्याजवळ सोमवारी दुपारी चार वाजता घडला. महेंद्र हिलाल चित्ते (40, चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघात प्रकरणी पाळधीच्या दुचाकीस्वाराविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घराकडे येत असताना क्रुर काळाचा घाला
चोपडा येथील महेंद्र चित्ते हा तरुण एरंडोल येथे लग्नात फेटे बांधण्यासाठी गेला होता. सोमवारी दुपारी लग्न आटोपून चोपड्याकडे येत असताना चार वाजेच्या सुमारास धरणगाव नजीकच्या पिंपळे निशाणी जिनिंग जवळ तरुणाच्या दुचाकी (एम.एच.19, ए.डब्ल्यू.4698) ला समोरुन येणार्‍या दुचाकी (एम.एच. 19 डी.टी.9589) ने जबर धडक दिली. या धडकेने महेंद्र चित्ते यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात प्रकरणी मृताचे नातेवाईक वासुदेव हिलाल चित्ते (47, निवृत्तीनगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून पाळधी येथील दुचाकीस्वार पवन कैलास कोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय करीम सैय्यद करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !