आसोदाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत यावलचे तिघे तरुण जखमी


Three Yaval youths injured in collision with speeding vehicle near Asoda यावल : जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील यावल शहरातील तिघे तरुण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

तिघे तरुण अपघातात गंभीर जखमी
यावल शहरातील रहिवासी तथा प्लंबिंगचे काम करणारे कामगार अमृत बाबुराव बारी (42), सैय्यद अशफाक अली (40) आणि गणेश पंडीत बाविस्कर (38) हे रविवार, 14 मे रोजी दुपारी चार वाजता काम आटोपून यावल येथे जाण्यासाठी दुचाकी (एम.एच.19 ए.डी.6888) व (एम.एच.19 ए.जी.4245) ने निघाले असता आसोदा गावाजवळ समोरून येणारी कार (क्रमांक एम.एच.43 ए.एन.2691) ने जोरदार धडक दिल्याने दोन्ही दुचाकीवरील तिघेजण रोडवर फेकले गेल्याने तिघे जण गंभीर जखमी झाले. स्थानिक गावकरी आणि काही तरुणांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !