मॉर्निंग वॉकला जाणार्या जामनेरातील वृद्धाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू
An elderly person in Jamner died after being hit by an unknown vehicle जामनेर : मॉर्निंग वॉकला निघालेल्या 68 वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जळगाव रोडवर घडला. वसंत दत्तात्रय सैतवाल (68, प्रकाश नगर, जामनेर) असे मयत वृध्दाचे नाव आहे.
अज्ञात वाहन धारकाविरोधात गुन्हा
वसंत सैतवाल हे आपल्या परीवारासह जामनेर शहरातील प्रकाश नगरात वास्तव्याला होते. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले. जळगाव रोडने घरी परतत येत असतांना भरधाव वेगाने येणार्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात चालक वाहनासह पसार झाला. मयत वृध्द हे जामनेर शहरातील आशा हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील सैतवाल यांचे वडील होय.


