जिल्हा शासकीय महाविद्यालयासमोरील चोरट्यांनी औषधांचे दुकान फोडले
Thieves broke into a medicine shop in front of District Government College जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील मेडीकल दुकान फोडण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. या घटनेत पाच ते सहा हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला असून या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. फरदीन शेख यांचे जिल्हा रुग्णालयाच्या गेट क्रमांक तीनसमोर एस. एन. फार्मा हे मेडिकल औषधांचे दुकान आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी दुकान सुरू केले असून सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दुकान बंद करून त्यांनी घर गाठले मात्र मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास दुकानाच्या शेजारी राहणार्या जागेच्या मालकाने फरदीन शेख यांना फोन करून दुकानाचे शटर वाकलेले अवस्थेत असल्याची माहिती दिली. फरदीन शेख हे तातडीने दुकानात आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद असून संशयित चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश करीत चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.


