जळगावात अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला
The body of an unknown youth was found in Jalgaon जळगाव : एमआयडीसी परीसरातील ट्रान्सपोर्ट नगराच्या गेटजवळ अंदाजे 32 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अनोळखीची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
एमआयडीसी परीसरातील ट्रान्सपोर्ट नगरातील गेटजवळ शनिवारी सकाळी आठ वाजता अंदाजे 32 वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला. स्थानिक नागरीकांनी यासंदर्भात एमआयडीसी पोलिसाांना कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी यांच्यासह कर्मचार्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता आच्छा यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.


