जामनेरात मध्यरात्री धाडसी चोरी : 23 हजारांचा मुद्देमाल लंपास


Daring theft at midnight in Jamner : 23 thousand worth of goods looted जळगाव : शहरातील आयटीआय कॉलनी भागात मध्यरात्री एका घरातून रोख रकमेसह मोबाईल आणि घड्याळ मिळून 23 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री केली चोरी
रमेश मोतीराम ब्राह्मणे (63, रा. आयटीआय कॉलनी, जामनेर) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. 11 मे रोजी रात्री 10 ते 12 मे रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात शिरून त्यांच्या घरातून रोख रकमेसह मोबाईल, चार्जर आणि घड्याळ असा एकूण 23 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी रमेश ब्राह्मणे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक मुकेश आमोदकर करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !