पारोळा तालुक्यातील अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती : आरोपीला अटक
Parola taluka minor girl pregnant due to torture: Accused arrested पारोळा : तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर धमकावून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सततच्या अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिली असून या प्रकरणी संशयित प्रवीण राजेंद्र सपकाळे (22, पारोळा तालुका) यास अटक करण्यात आली.
धमकावून केला अत्याचार
पीडीतेच्या तक्रारीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावातील संशयित प्रवीण राजेंद्र सपकाळे (22, पारोळा तालुका) याने नोव्हेंबर 2022 ते आजपर्यंत ओळख वाढवून संशयिताच्या व पीडीतेच्या घरी येवून वारंवार अत्याचार केला तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास पीडीतेच्या लहान बहिणीवरही अत्याचार करण्याची धमकी दिली. पीडीतेच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिची अमळनेरातील डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणी केली असता पीडीता गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडतेने कुटूंबासह पारोळा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून संशयिताविरोधात अत्याचारासह पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.


