भुसावळात रेल्वेच्या रोजगार मेळाव्यात 372 उमेदवारांना नियुक्तीपत्र

पारदर्शक भरती प्रक्रियेमुळे बेरोजगार युवकांनी मानले प्रशासनाचे आभार


Appointment letter for 372 candidates in railway employment fair in Bhusawal भुसावळ : केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यात 372 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्ती मिळाल्याने निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. रेल्वेतील भरती प्रक्रिया वेळेवर आणि पारदर्शकतेने झाल्याने उमेदवारांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एस.केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी, सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे, सहायक कार्मिक अधिकारी प्रदीप कलाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कल्याण निरीक्षक, कार्मिक विभाग, भर्ती विभाग, एस अ‍ॅण्ड टी विभाग विद्युत विभाग आणि यांत्रिकी विभागाने सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !