जळगावात धूम स्टाईल वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले


जळगाव : शहरातील महाबळ परीसरातील नूतनवर्षा कॉलनीत घराबाहेर कचरा फेकण्यासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून भामट्यांनी धूम स्टाईल येत मंगळसूत्र लांबवले. या प्रकरणी बुधवारी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात टोळी सक्रिय
प्रेमलता नारायण सोनवणे (70, रा.नूतन वर्षा कॉलनी, महाबळ, जळगाव) या वृद्ध महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. बुधवार, 3 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रेमलता सोनवणे या घरातील कचरा फेकण्यासाठी कचराकुंडीकडे जात असतांना समोरून एक तरुण त्यांच्याजवळ आल्यानंतर त्याने वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत जबरी हिसकावून पळ काढला. वृध्द महिलेने आरडाओरड केली तोपर्यंत संशयित पसार झाला होता. या संदर्भात वृद्ध महिलेने बुधवार, 17 मे रोजी दुपारी एक वाजता रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !