भाई बनण्याच्या प्रयत्नातील जळगावचा मन्या सुर्वे यंत्रणेच्या जाळ्यात


Bhaigiri Bhovali in Jalgaon : Crime against four जळगाव : जळगावातील तथाकथित मन्या सुर्वे वाहनाच्या बोनटवर बसून सोशल मिडीयावर व्हायरल होताच पोलिसांनी संशयितासह अन्य तिघांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे शिवाय भाई बनण्याच्या प्रयत्नातील मन्या सुर्वेने घडल्या प्रकाराविषयी माफिदेखील मागितली आहे.

बोनटवर बसून बनवला व्हिडिओ
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून फिरताना विठ्ठल भागवत पाटील (ज्ञानदेव नगर), अक्षय सपकाळे (खेडी आव्हाणे), गौतम यशवंत पानपाटील (सावखेडा बुद्रुक) व देवेंद्र सोपान सपकाळे (खेडी आव्हाणे) या चार तरुणांनी मंगळवार, 16 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास चारचाकीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओवर जळगावचा मन्या सुर्वे असा मजकूर लिहून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी विठ्ठल पाटील याला ताब्यात घेतले. याप्रकरणी बुधवारी पोलीस नाईक राजेश नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल भागवत पाटील, अक्षय सपकाळे, गौतम यशवंत पानपाटील व देवेंद्र सोपान सपकाळे यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !