झाडी शिवारात मक्याला आग : शेतकर्याचे दिड लाखांचे नुकसान
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील झाडी शिवारात आग लागल्याने शेतातील मका, ठिबक नळ्या व पाईप जळून दीड लाखांचे नुकसान झाले. मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
शेतकर्याने केली भरपाईची मागणी
मोगल लोभान भील (40, रा. धानोरा, ता.अमळनेर) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करतात. मोगल भील यांचे अमळनेर तालुक्यातील झाडी शिवारात शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी मका काढून ठेवलेला होता. बुधवार, 17 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानकपणे ठिणगी पडून मका पिकाला आग लागली, या आगीत मका पिकासह ठिंबक नळ्या आणि पाईप जळून खाक झाले. आगीत अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले. ही घटना घडल्यानंतर मोगल भील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिल्याने अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहे.


