Bananas hit by high temperature: Compensation of Rs 43 thousand 500 per hectare to producers जादा तापमानाने केळीला फटका : उत्पादकांना प्रति हेक्टर 43 हजार 500 रुपयांची भरपाई


Relief to Banana Growers : Farmers in 50 revenue circles will get compensation मुक्ताईनगर : जिल्ह्यातील 50 महसूल मंडळात सलगपाच दिवस तापमान 45 डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसल्याने केळी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजना आंबिया बहारमधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार 10 ते 15 मे दरम्यान सर्वाधिक तापमानामुळे नुकसान झाल्याने केळी उत्पादकांना प्रति हेक्टरी 43 हजार 500 रुपयांची माहिती मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

जानेवारी महिन्यातील भरपाई लवकरच मिळणार
यापूर्वी जानेवारी महिन्यात सलग तीन दिवस कमी तापमानामुळे झालेल्या नुकसानीची प्रति हेक्टरी रक्कम 26 हजार 500 (कमी व जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना मिळणार असल्याची खासदारांनी दिली.

मे महिन्यात नुकसान झालेले महसूल मंडळ असे
रावेर लोकसभा क्षेत्र- रावेर तालुका- ऐनपूर, खानापूर, खिर्डी बु.॥., खिरोदा, निंभोरा बु.॥., रावेर, सावदा

चोपडा तालुका- अडावद, लासूर, धानोरा प्र.॥, चोपडा, गोरगावले, हातेड बु.॥, चहार्डी.

मुक्ताईनगर- घोडसगाव, अंतूर्ली, कुर्‍हे, मुक्ताईनगर

यावल- भालोद, साकाळी, किनगाव बु.॥, बामणोद, यावल, फैजपूर

भुसावळ तालुका : वरणगाव, पिंपळगाव खुर्द, भुसावळ

जळगाव तालुका : पिंप्राळा, असोदा, जळगाव शहर, भोकर, म्हसावद, नशिराबाद

अमळनेर : अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, शिरुड, वावडे

चाळीसगाव तालुका- शिरसगाव, धरणगाव- धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद. एरंडोल तालुका- एरंडोल, रींगणगाव, पारोळा- तामसवाडी, भडगाव- भडगाव


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !