प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आता महिनाभर ईगतपुरीपर्यंतच धावणार


Bhusawal-Pune Hutatma Express will now run till Eagatpuri for a month भुसावळ : हजारो प्रवाशांसाठी दिलासा ठरणारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस एका महिन्यासाठी केवळ ईगतपुरीपर्यंतच धावणार असून या गाडीला मेमूचे रॅक जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भुसावळ-पुणे गाडीला 20 मे ते 19 जून 2023 दरम्यान मेमू रॅक जोडण्यात येणार असून ही गाडी भुसावळून ईगतपुरी व तेथून पुन्हा भुसावळ अशी धावणार आहे.

गाडीच्या वेळेत बदल नाही
भुसावळ येथून रात्री 12.30 वाजता सुटणारी ही गाडी रात्री त्याच वेळी सुटणार आहे. मात्र ही गाडी फक्त ईगतपुरीपर्यतच चालविली जाणार आहे. ईगतपुरीच्या पुढे कल्याण, पनवेल, लोणावळा, पुण्यासाठी ही गाडी चालविली जाणार नाही. ईगतपुरीच ही गाडी दिवसभर थांबून परतीच्या वेळेत तेथून सुटून रात्री भुसावळ येथे परत येणार आहे.

मेमू रॅकमुळे गैरसोय
या गाडीला केवळ मेमूचे रॅक राहणार असल्याने त्यामुळेदेखील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असल्याने लोकप्रतिनिधींनी या संदर्भात दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !