नवसाच्या धार्मिक कार्यक्रमात नाचताना चोपड्यातील तरुणाचा मृत्यू


Chopda youth dies while dancing in Navas ritual चोपडा : नातेवाईकांकडे नवसाच्या धार्मिक कार्यक्रमात नाचत असताना अचानक चक्कर येवून कोसळलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादाकय घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. संदीप नीळकंठ चव्हाण (24, रामपूरा, पारधीवाडा) असे मयताचे नाव आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

चक्कर येवून पडताच मृत्यू
मयत संदीप चव्हाण याच्या काकांकडे कुलदैवताचा नवसाचा धार्मिक कार्यक्रम गुरुवारी असल्याने गुरुवार, 18 रोजी पहाटे 3.30 वाजता गाण्यांवर नाचत असताना संदीपला चक्कर येताच तो जमिनीवर पडला. त्याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल ककेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत्यूच्या काही तासांपूर्वी संदीपने चुलत भावाचा लग्नाचा वाढदिवस केक कापल्याचेही सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !