अमळनेरच्या यात्रोत्सवात 24 वर्षीय विवाहितेचा विनयभंग : पतीला चौकडीकडून मारहाण
24-year-old married woman molested in Amalner Yatra festival: Husband beaten up by quartet
यात्रोत्सवात आलेल्या विवाहितचेा विनयभंग : अमळनेरातील घटना
अमळनेर : शहरातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवात उंच पाळण्यावर बसण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या विवाहितेचा विनयभंग करून विवाहितेच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बोरी पात्रात बुधवारी 10 वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीला मारहाण करीत विवाहितेचा विनयभंग
अमळनेर येथील बोरी नदी पात्रात श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी रात्री 10 वाजता शहरातील एका भागातील 24 वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह यात्रोत्सव पाहण्यासाठी आल्यानंतर उंच पाळण्यात बसण्यासाठी गर्दी असल्याने रांगेत हे दाम्पत्य उभे होते. यावेळी रांगेतील उभ्या चौघा तरुणातील एकाने यावेळी विवाहितेच्या पतीला धक्का मारला व त्यास जाब विचारताच संशयितांनी विवाहितेच्या पतीला अश्लील शिविगाळ सुरू केल्याने विवाहिता बोलण्यासाठी गेली असता आरोपींनी महिलेचा हात पकडून तिलाही अश्लील शिविगाळ करीत विनयभंग केला व विवाहितेच्या गालावर चापट मारली तर या प्रकारानंतर पीडीतेने आरोपीला धक्का देत स्वतःची सुटका करून घेतली.
या संशयितांविरोधात गुन्हा
आरोपींशी झालेल्या झटापटीत विवाहितेच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र तुटून नुकसान झाले तर आरोपींनी विवाहितेच्या पतीला शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून हर्षल उर्फ पाट्या नाना पाटील (पैलाड, अमळनेर), प्रवीण उर्फ चिया प्रकाश पाटील (शनीपेठ पैलाड, अमळनेर) तसेच सोबतच्या अन्य दोघे अशा चौघांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहेत.


