भडगाव शहरात गोदाम फोडून पावणेदोन लाखांची रोकड लांबवली
Two lakh cash was stolen after breaking into a godown in Bhadgaon city भडगाव :एमआयडीसी भागातील गंगाई इंडस्ट्रीजमधून चोरट्यांनी पावणेदोन लाखांची रोकड लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय ऑफीससह गोदामातील ठिकाणी देखील चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
भडगाव शहरातील एमआयडीसी भागात गट क्रमांक 82/2 मधील प्लॉट क्रमांक सातमध्ये गंगाई इंडस्ट्रीजचे गोदाम आहे. चोरट्यांनी बुधवार, 17 मे च्या रात्री 8.30 ते 18 मे 2023 च्या सकाळ दरम्यान गोदामाच्या खिडकीचे लॉक तोडून आत प्रवेश करीत ऑफिस लोखंडी कपाटातील एक लाख 75 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी तुषार अवधूत देशमुख (भडगाव) यांनी भडगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.


