जळगावात दुचाकींचा अपघात : महिलेसह मुलगी जखमी
जळगाव : शहरातील दादावाडी परीसरातील अष्टभुजा मंदिराजवळ एका भरधाव दुचाकीने स्कूटीला धडक दिल्याने स्कूटीवरील महिलेसह तिची मुलगी जखमी झाली. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
वंदना किशोर साळुंखे (जळगाव) या मुलगी हर्षालीसोबत स्कुटी (एम.एच. 19 ए.जे.9141) ने गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दादावाडी परीसरातून येत असतांना अष्टभुजा मंदिराजवळ रस्त्यावर दुचाक (एम.पी. 47 एम.सी.2404) ने वंदना साळुंखे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने वंदनासह त्यांची मुलगी हर्षाली या खाली पडून जखमी झाल्या. वंदना यांच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर होवून त्यांच्या हाता-पायास तसेच डोक्यास दुखापत झाली तर हर्षाली हिच्या झाले. हातापायाला मुकामार लागून दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार दुचाकी सोडून पसार झाला. या अपघातप्रकरणी वंदना साळुंखे यांच्या तक्रारीवरुन रात्री साडेअकरा वाजेचया सुमारास तालुका पोलिसात अपघातास कारणीभूत ठरलेला दुचाकीस्वार राजकुमार राजू काजदे (पांढरीप्लॉट, पिंप्राळा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक प्रकाश चिंचोरे हे करीत आहेत.


