अवैध वाळू वाहतूकदारांची दादागिरी : कानळद्यात मंडळाधिकार्‍याशी घातला वाद, त्रिकूटाविरोधात गुन्हा


Bullying of illegal sand transporters: Argument with board officer in Kanalda, crime against the trio जळगाव : जळगाव तालुक्यातील कानळदा येथे वाळूची चोरटी वाहतूक करणार्‍या बैलगाडीवर मंडळाधिकारी यांनी कारवाई केल्यानंतर े बैलगाडीधारकासह इतर दोन जणांनी मंडळाधिकारी व इतर कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या प्रकरणी तिघांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
जळगाव तालुक्यातील कानळदा गावानजीक असलेल्या गिरणनदी पात्रातून अवैध वाळूची चोरटी वाहतूक बैलगाडीतून होत असल्याची माहिती जळगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार मंडळाधिकारी यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी किशोर ठाकरे व मनोज कोळी यांनी कानळदा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोरून चोरीची वाळू वाहतूक करणारी बैलगाडी पकडली. यावेळी वाहतूक करणार्‍या बैलगाडीधारकाला वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे परवाना नसल्याने बैलगाडी ही तहसील कार्यालयात आणा, असे सांगितले. याचा राग आल्याने बैलगाडीधारक मनोज रतन पारधी, त्याची पत्नी सुनंदा मनोज पारधी आणि मुलगा दीपक मनोज पारधी यांनी मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांच्यासह कर्मचार्‍यांशी धक्काबुक्की करून हुज्जत घातली.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
त्यानंतर बैलगाडी घेऊन पळ काढला. या संदर्भात किरण बाविस्कर यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर मनोज रतन पारधी, दीपक मनोज पारधी, सुनंदा मनोज पारधी (सर्व रा.कानळदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !