प्लॉट खरेदी व्यवहारात जळगावच्या तरुणाची 11 लाखात फसवणूक


Jalgaon youth cheated for 11 lakhs in plot purchase transaction जळगाव : बँकेचा 35 लाखांचा बोजा न दाखवता नाशिक येथील प्लॉट विक्री करण्याचे आमिष दाखवून नात्यातील इसमानेच जळगावातील तरुणाची 10 लाख 75 हजार रुपये घेवून फसवणूक केली. या प्रकरणी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात अविनाश तुकाराम येवले (राजश्री एम्पायर, अभियंता नगर, कामटवाडा, नाशिक) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नात्यातील व्यक्तीनेच घातला गंडा
शहरातील मानराज पार्कजवळील विद्या नगरातील निशिगंधा अपार्टमेंटमध्ये सचिन चंद्रकांत शिरुडे हे वास्तव्यास आहेत. ते औषधींचे डीस्ट्रीब्युटर्स आहे. त्यांचे मामा राजेंद्र येवले यांचे साडू अविनाश तुकाराम येवले (राजश्री एम्पायर, अभियंता नगर, कामटवाडा, नाशिक) यांच्याशी पूर्वी जवळचे संबंध होते. मे 2017 मध्ये अविनाश येवले यांनी नाशिक येथील त्यांच्या मालकीचा प्लॉट भविष्यातील गुंतवणुकींच्या दृष्टीने खरेदी करण्यासाठी गळ घातली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून 30 मे 2017 मध्ये सचिन शिरुडे हे त्यांच्या वडीलांसोबत नाशिक येथे गेले होते. प्लॉट बघितल्यानंतर सचिन शिरुडे यांनी जळगाव तहसील कार्यालयाजवळ आले होते. यावेळी अविनाश येवले यांनी सांगितले की, हा प्लॉट बोजाविरहीत व बिनाजोखमीचा असल्याचे सांगत विश्वास दिल्याने 11 लाख 11 हजारात या प्लॉटचा सौदा ठरला. 11 हजार बयाना रक्कम देण्यात आली व प्लॉटच्या खरेदीसाठी उर्वरीत पैसे वेळोवेळी सचिन शिरुडे यांनी आपल्या बँक खात्यातून अविनाश येवले यांच्या खात्यावर सुमारे नऊ लाख 48 हजार रुपये तर त्यांच्या पत्नीच्या खात्यावरुन एक लाख 27 हजार असे एकूण 10 लाख 75 हजार रुपये पाठविले.

अखेर तरुणाची पोलिसात धाव
पैसे पाठविल्यानंतर शिरुडे यांनी प्लॉट खरेदी करुन देण्यासाठी तगादा लावून देखील अविनाश येवले यांनी प्लॉट खरेदी करून दिला नाही. अविनाश येवले हे प्लॉट खरेदी करुन देण्यास टाळाटाळ करीत होते. यावेळी सचिन शिरुडे यांना व्यवहारातील प्लॉटवर येवले यांनी 9 नोव्हेंबर 2017 रोजी बँकेचा 35 लाखांचा बोजा आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन शिरुडे यांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !