भोरटेकला बिहार पॅटर्न अंतर्गत लावलेली हजारो झाडे जळून खाक


अमळनेर : तालुक्यातील भोरटेक येथे बिहार पॅटर्न अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली असताना शुक्रवारी एकाने शेती बांध जाळण्यासाठी आग लावल्याने या आगीत सुमारे 4 ते 5 हजार वेगवेगळ्या प्रकारची झाडे जळून खाक झाली.

अचानक लागली आग
एका शेतकर्‍याचा शेतातील मकाही जळून मोठे आर्थिक नुकसान त्यांचे झाले. ही घटना 19 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. उपसरपंच अमोल राजपूत व रोजगार सेवक संदीप राजपूत व ग्रामस्थानी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केल. नगरपालिकेचा अग्निशमन बंब देखील बोलविण्यात आला मात्र आगीचे रूप मोठे असल्याने लहान झाडे वाचू शकले नाहीत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !