Daya Nayak 20 वर्षानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक मुंबई क्राईम ब्रांचमध्ये


After 20 years, encounter specialist Daya Nayak in the police force मुंबई : तब्बल दोन दशकाच्या प्रतीक्षेनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती असलेले पोलीस अधिकारी दया नायक पोलीस दलात रूजू झाले असून त्यांना आता गुन्हे शाखेत जबाबदारी देण्यात आली आहे. तब्बल दोन दशकानंतर दया नायक मुंबई क्राईम ब्रांचमध्ये रुजू झाले आहेत. मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशन मानण्यात येणार्‍या बांद्रा क्राईम ब्रांच येथे त्यांना पोस्टींग मिळाली आहे. मुंबईत अंडरवर्ल्डचा थरार असताना 1999 ते 2003 या कालावधीत दया नायक यांनी मुंबईतील अंधेरी येथे सीआययूमध्ये काम केले होते.

पाच अधिकार्‍यांना मिळाली पोस्टींग
दया नायक यांच्यासोबत पाच अन्य अधिकार्‍यांनादेखील नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे. मानखुर्द, मरीन ड्राईव्ह, कांदिवली आणि मुंबई वाहतूक पोलिसांमध्ये त्यांना पोस्टिंग दिली गेली आहे.महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत नवी पोस्टिंग मिळाल्याची माहिती दया नायक यांनी ट्विटरवरुन दिली.

84 एन्काऊंटर नावे
दया नायक यांनी तब्बल 84 एन्काऊंटर केले असून आपल्या पोलीस सेवेत हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक केली आहे. राम गोपाल वर्मा यांच्या अब तक 56 या सिनेमातील प्रमुख पात्रावरुन नेहमीच वाद राहिला. हा चित्रपट दया नायक यांच्या कारकिर्दीवरच असल्याचं बोललं जातं. प्रदीप शर्मा जे दया नायकचे कधीकाळी बॉस होते, त्यांनीही या चित्रपटाबद्दल असंच विधान केलं होतं.

तुम्हा सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करेन आणि माझ्या पूर्ण क्षमतेनं मुंबईची सेवा करेन, असं नायक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 28 मार्चला महाराष्ट्र एटीएसमधून दया नायक यांची मुंबई पोलिसात बदली झाली मात्र त्यानंतर दोन महिने त्यांना पोस्टिंग मिळाली नव्हती. 28 मार्चपासूनच ते पोस्टिंगच्या प्रतीक्षेत होते. दया नायक जवळपास तीन वर्षे एटीएसमध्ये कार्यरत होते. 2003 मध्ये क्राईम ब्रांच सोडल्यानंतर आता 2023 मध्ये ते क्राईम ब्रांचसाठी काम करणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !