BJP corporator assaults 30-year-old married woman in Shendurni शेंदुर्णीतील 30 वर्षीय विवाहितेवर भाजपा नगरसेवकाचा अत्याचार : जमावाकडून चोप


BJP corporator assaults 30-year-old married woman in Shendurni : Chopped by mob शेंदुर्णी  :विवाहितेचा पती घरी नसल्याची संधी साधून शहरातील भाजपा नगरसेवकाने 30 वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर महिलेने आरडा-ओरड केल्याने जमाव जमल्यानंतर जमावाने भाजपा नगरसेवक शरद बाबूराव बारी यास जमावाने चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी नगरसेवकाला जमावाकडून चोप
शेंदूर्णी गावातील एका भागात 30 वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्यास आहे. शनिवार, 20 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडीतेचे पती घरी नसताना संशयित आरोपी तथा नगरसेवक शरद बाबूराव बारी याने अनधिकृतपणे घरात प्रवेश करत दरवाजा बंद केला व महिलेशी जबरदस्ती केल्यानंतर महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिचे तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला तसेच या प्रकाराबाबत ‘कोणाला काहीही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना मारून टाकेल’ व समाजात तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली मात्र यावेळी संतप्त जमाव नगरसेवकाला झोडपून काढत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने पहूर पोलीस ठाण्यात धाव तक्रार दिल्यानंतर शरद बाबूराव बारी यांच्या विरोधात रविवारी राात्री अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !