भुसावळात उद्या पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा सत्कार


भुसावळ  : भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाल्यानंतर त्यांचा शहरातील विविध संस्था व संघटनांतर्फे शुक्रवारी सत्कार करून निरोप देण्यात येणार आहे.

गेल्या तीन वर्षांच्या काळात शहरातील गुन्हेगारीला लगाम लावण्यात वाघचौरे यांना यश आल्यानंतर शहरवासीयांमध्ये त्यांचा नावलौकीक वाढला होता. शहरातील मातृभूमी चौक, प्रोफेसर कॉलनीतील तेरापंथ भवनात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता हा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !