रेल्वे उत्पन्न वाढविण्यासाठी मोहिम राबवणार : भुसावळचे सिनीयर डीसीएम धीरेंद्र सिंग यांची ग्वाही


Railways will conduct a campaign to increase revenue: Testimony of Senior DCM of Bhusawal Dhirendra Singh भुसावळ : रेल्वेचे सिनीयर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे यांची मुंबईत पीआरओपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागेवर मुंबई येथून धीरेद्रसिंग यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी बुधवारी भुसावळ येथे येत पदभार स्विकारला.

उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार
डीआरएम कार्यालयात दुपारी धीरेद्रसिंग यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी यापूर्वी नागपूर, मुंबई येथे विविध पदांवर काम केले आहे. यावेळी डीसीएम ए.के.पाठक यांच्यासह वाणिज्य विभागातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. विभागातील तिकीट तपासणीला प्राधान्य देऊन रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !