अमळनेरात उघड्या घरातून सहा मोबाईलसह 13 हजारांची रोकड लांबवली


13,000 cash along with six mobile phones were recovered from an open house in Amalner अमळनेर : चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करीत 13 हजार 300 रुपयांची रोकड व सहा मोबाईल लांबवल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
प्रमोद सुकलाल बारी (अशोक गेस्ट हाऊस, स्टेशन रोड, अमळनेर) यांच्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी पवन रामदास पाटील यांच्या उघड्या घरातून प्रवेश करीत 12 हजार रुपये किंमतीचे सहा मोबाईल तसेच 13 हजार 300 रुपये किंमतीची रोकड लांबवली. एकूण 25 हजार 300 रुपये किंमतीचा ऐवज चोरी प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एएसआय रामकृष्ण कुमावत करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !