सोशल मिडीयावर टाकला धार्मिक भावना दुखावणारा मजकूर ; म्हसावदच्या पाच संशयितांना पोलिसांकडून अटक


Content that hurts religious sentiments posted on social media; Police arrested five suspects of Mhasavad जळगाव : सोशल मिडीयावर दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असा संदेश टाकून तो प्रसारीत करणार्‍या म्हसावद, ता.जळगाव येथील 11 संशयितांविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पाच संशयितांना अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने यापूर्वीच सोशल मिडीयावर करडी नजर असल्याचे सांगत धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस वा संदेश टाकल्यास कारवाईचा इशारा दिला होता मात्र त्यानंतर काहींनी कायद्याचे उल्लंघण केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या संशयितांविरोधात गुन्हा
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल राकेश जयराम बच्छाव यांच्या तक्रारीवरून अशोक बळीराम भील, ज्ञानेश्वर संजू शिरोळे, सागर परदेशी, जयवीर राजपूत, माजीत बाबूलाल पटेल, अबुजार पटेल, आरीफ रज्जाक मणियार, कासीम रज्जाक मणियार, अशपाक गुलाम रसुल शाह, इमरान सुभान पटेल (सर्व रा.म्हसावद, ता.जळगाव) यांच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितानी 11 जूनपूर्वीच्या पंधरा दिवस आधी दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे संदेश प्रसारीत केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोशल मिडीयावर करडी नजर : जयपाल हिरे
पोलीस प्रशासनाची सोशल मिडीयावरील व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या अ‍ॅप्सवर करडी नजर असून कुणीही दोन धर्मात वा समाजात तेढ निर्माण होईल, असे संदेश टाकू नये वा प्रसारीत करू नये अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !