नदीपात्रात पाय घसरून अडावदच्या तरुणाचा मृत्यू
A youth of Adavad died after falling in the river bed शिरपूर : शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील महादेव मंदिरात परीवारासह दर्शनासाठी आलेल्या अडावद, ता.चोपडा येथील 21 वर्षीय तरुणाचा तापी नदी पात्रात पाय घसरल्यानंतर बुडाल्यान मृत्यू झाला. सुकदेव मंगेश खजरे (21, अडावद, ता.चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पाण्यात पडताच मृत्यू
सुकदेव मंगेश खजरे हा युवक परीवारासह सोमवार, 12 जून रोजी दर्शनासाठी आला असता सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तापी काठावर तो पाय धूत असताना अचानक त्याचा पाय घसरला व तो बुडू लागला. त्याचक्षणी त्याच्या नातेवाईकांनी आरडाओरड केल्यामुळे जवळील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणार्यांनी लागलीच तरुणाला बाहेर काढल्यानंतर उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत थाळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


