भुसावळात चाकूच्या धाकावर दुचाकी लांबवली : बहाळच्या तरुणाविरोधात गुन्हा


Bhusawal knife-pointed two-wheeler : Crime against youth of Bahal भुसावळ : शहरातील नाहाटा चौफुलीवर युवकाला चाकूचा धाक दाखवून संशयिताने 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी व आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली. या प्रकरणी बहाळ, ता.चाळीसगाव येथील संशयिताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेगावात भेट अन भुसावळात केली लूट
समजलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मंगेश भरत बेलखुडे (30, पांडववांड, विजासन रोड, भद्रावती, जि.चंद्रपूर) यांच्या तक्रारीनुसार. संशयित विनोद सरदार परदेशी (जामडी प्र.बहाळ, ता.चाळीसगाव) याने भुसावळातील नाहाटा चौफुलीवजळ रविवार, 11 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून दुचाकी (एम.एच.34 बी.ई.0495) व आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला. लूट झाल्यानंतर तरुणाने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. दरम्यान, संशयित व तक्रारदाराची शेगावात भेट झाल्याची माहिती आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सत्तार शेख करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !