पालकमंत्री गुलाबरावांचा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांसोबत राजधानी एक्स्प्रेसने प्रवास
Guardian Minister Gulabrao traveled with NCP President Sharad Pawar by Rajdhani Express जळगाव : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाले व सरकार भाजपाच्या मदतीने सत्तेवर आले. राज्यातील सत्ताबदलानंतर कमालीचे राजकीय मतभेट वाढले असतानाच शिंदे सरकारमधील मंत्री असलेले गुलाबराव पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राजधानी एक्सप्रेसने मुंबईहून जळगावपर्यंत सोबत आल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली. ट्रेनच्या एकाच डब्यातून शेजारी बसून दोघत्त नेत्यांनी प्रवास केल्याचे फोटो समोर आल्याने विविध चर्चांना उधाणदेखील आले.
शरद पवारांचे जळगावात स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे शुक्रवार, 16 जून रोजी जळगाव जिल्हा दौर्यावर आले आहेत. अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर/ कार्यशाळेचे शरद पवार यांच्याहस्ते शुक्रवारी उद्घाटन होणार असून गुरुवारी रात्री त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले.

विकासकामांवर रंगल्या गप्पा !
दरम्यान, जळगाव येण्यापूर्वी शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार पवार यांची भेट घेत त्यांच्याशी केलेल्या दिलखुलास गप्पा या राजकारणात खळबळ उडवणार्या ठरल्या आहेत तर अनेकांना या भेटीने आश्चर्याचा धक्कादेखील बसला आहे. दोघांमधील चर्चेचा तपशील समोर आला नसलातरी विकासकामांसह अन्य राजकीय बाबींवर सखोल चर्चा झाल्याची चर्चा आहे.
