रायपूर कुसुंबा येथे घरफोडी : 42 हजारांचा मुद्देमाल लांबवला
Burglary in Raipur Kusumba : Property worth 42 thousand recovered जळगाव : जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे तरुणाचे बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड मिळून 42 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. या प्रकरणी बुधवारख 14 जून रोजी दुपारी दोन वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
महेश नाना सोनार (38, रा.रायपूर कुसुंबा, ता.जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. 7 जून सायंकाळी सहा ते 14 जून पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान महेश सोनार यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने व रोकड असा एकूण 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक मुदस्सर काजी करीत आहे.


