भुसावळात चाकूच्या धाकावर दुचाकी लांबवली : चाळीसगाव तालुक्यातील कुविख्यात गुन्हेगार जाळ्यात
Two-wheeler stolen at knifepoint in Bhusawal : Notorious criminals in Chalisgaon taluka भुसावळ : शहरातील नाहाटा चौफुलीवर युवकाला चाकूचा धाक दाखवून संशयिताने 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी व आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी संशयित विनोद उर्फ बापू सरदार परदेशी (39, जामडी प्र., ता.चाळीसगाव) यास अटक केली असून त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयित परदेशी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरोधात जळगावसह धुळे जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत.
बाजारपेठ पोलिसांची कारवाई
तक्रारदार मंगेश भरत बेलखुडे (30, पांडववांड, विजासन रोड, भद्रावती, जि.चंद्रपूर) यांना संशयित विनोद सरदार परदेशी (जामडी प्र.बहाळ, ता.चाळीसगाव) हा शेगाव येथ भेटला व चालकाचे काम मिळवून देतो म्हणून तो बेलखेडे यांच्यासोबत दुचाकी (एम.एच.34 बी.ई.0495) ने रविवारी भुसावळात आला मात्र नाहाटा चौफुलीवर संशयिताने चाकू काढून बेलखुडे यांचा मोबाईल हिसकावला तसेच त्यांच्याकडील दुचाकी जबरीने हिसकावून पळ काढला होता.
यांनी आवळल्या मुसक्या
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सत्तार शेख, कॉन्स्टेबल सत्तार चौधरी, जावेद शहा आदींनी आरोपीचा माग काढत सिल्लोड येथून त्यास अटक केली.


