जळगावात धीरू पॉलिमर कंपनीत भीषण आग : लाखोंचे नुकसान 

लाखोंचे नुकसान ; एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगीची नोंद


Massive fire at Dhiru Polymer Company in Jalgaon: Loss worth lakhs जळगाव : शहरातील एमआयडीसी परीरसरातील व्ही-सेक्टरमधील धिरू पॉलिमर कंपनीत ईलेक्ट्रीक डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगी प्रकरणी गुरूवार, 15 जून रोजी एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

डीपीतील शॉर्ट सर्किटने आग
जळगाव एमआयडीसीतील व्ही.सेक्टरमध्ये धिरू पॉलिमर्स प्रायव्हेट कंपनी असून या कंपनीत ठिंबक नळ्या व पाईप तयार केले जातात. कंपनीच्या बाजुला असलेल्या भिंतीजवळ महावितरण कंपनीचे ईलेक्ट्रीक डीपी आहे. बुधवार, 14 जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ईलक्ट्रीक डी.पी.वर शार्टसर्कीटमुळे कंपनीतील ठिंबक नळ्यांनी पेट घेतला. यात कंपनीतील 15 टन प्लास्टिक नळ्यांचा सामान, कच्चा माल, मशीन व इतर साहित्य जळून खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी गुरूवारी एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विजय पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !