पिंप्राळ्यातील वृद्धेचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू
Elderly in Pimprala dies after being hit by a train जळगाव : पिंप्राळा हुडको भागातील रहिवासी वृद्धेचा धावत्या रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू ओढवला. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. साबेराबी जहूर कुरेशी (59, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृत वृध्दचे नाव आहे.
अखेर पटली ओळख
साबेराबी कुरेशी ही वृध्द महिला शहरातील पिंप्राळा हुडको परीसरात दोन मुल व सुनांसह वास्तव्याला होत्या. लग्नातील कार्यक्रमात कामासाठी नेहमी जात होत्या. नेहमीप्रमाणे गुरूवार, 15 जून रोजी सकाळी 11 वाजता त्या लग्न कार्यालयात कामाला गेल्या असता घरी परतत असतांना दुपारी चार वाजेच्या सुमारास पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळून जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरूवातीला अनोळखी म्हणून रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
घटनास्थळी काही नागरीकांनी मयत वृध्द महिलेला ओळखले. साबेराबी कुरेशी हे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या मुलगा जुबेर कुरेशी याने मयताची ओळख पटविली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. शुक्रवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला व अजीज शहा करीत आहे.


