अमळनेर दंगलीतील संशयिताचा मृत्यू : सीआयडीकडून तपासाला सुरूवात


Suspect’s death in Amalner riots: CID starts investigation जळगाव : अमळनेर दंगलीतील संशयित आरोपी तथा माजी नगरसेवक पूत्र अशपाक सलीम शेख उर्फ पक्या (33, गांधी पूरा, अमळनेर) याचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी सीआयडीकडे तपास देण्यासह दोषींवर कारवाईची मागणी झाल्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांनी नाशिक सीआयडीला तपासाचे आदेश दिले व त्याबाबतचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी दुपारी प्राप्त होताच सीआयडीने तपासाला सुरूवात केली आहे.

असे आहे संशयिताच्या मृत्यूचे प्रकरण
मुलांच्या वादातून अमळनेर शहरात दोन समाजात दंगल उसळल्याची घटना 9 मे रोजी रात्री 10.30 वाजता घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करीत माजी नगरसेवक पूत्र अशपाक सलीम शेख उर्फ पक्या यास अटक केल्यानंतर 14 रोजी सायंकाळी सात वाजता न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. इनकॅमेरा संशयिताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी केल्यानंतर अपर पोलीस महासंचालकांनी नाशिक सीआयडीला तपासाचे आदेश दिल्यानंतर तपासाला सुरूवात झाली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !