धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावच्या प्रौढाचा दुदैवी मृत्यू


Unfortunate death of an adult from Jalgaon after falling from a running train पाचोरा : पाचोरा रेल्वे स्थानका जवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावच्या 46 वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 15 जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

धावल्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू
पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खंबा कि. मी. क्रं. 373/9 नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाासी रेल्वेतून पडल्याने जगदीश ईश्वरीप्रसाद शुक्ला (46, देवराम नगर, कमला पार्क, जळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे ए.एस.आय. किशोर वाघ हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्यासह दाखल झाले. मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास चाळीसगावचे सहाय्यक निरीक्षक किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे ए.एस.आय. किशोर वाघ करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !