अमळनेरात राष्ट्रवादीच्या रोड शोसह कार्यक्रमात चोरट्यांनी 26 जणांकडील रोकडसह मोबाईल लांबवले
Thieves stole mobile phones with cash from 26 people during NCP’s roadshow program in Amalner अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार हे शुक्रवारी अमळनेर येथे कार्यक्रमानिमित्त आले होते तर अजित पवार, जयंत पाटील आदींच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आल्यानंतर शहरात झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत संशयितांनी तब्बल 26 जणांचे पाकिटासह मोबाईल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी एकूण 19 हजार 500 रुपयांची रोकड लांबवल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चार संशयित अटकेत
गौरव उदय पाटील (42, समर्थ नगर, धुळे रोड, अमळनेर) यांच्या फिर्यादीनुसार, समीर शहा सलीम शहा (22, रामदेवबाबा नगर धुळे), हमीदअली मोहम्मद उमर (42, रोशनबाग मालेगाव), उमर फारुख शेख लतीफ (22, आझाद नगर मालेगाव), भैया विक्रम खैरनार (38, बालाजी नगर, शिरपूर) यांना अटक करण्यात आली.


