जळगावात हद्दपार आरोपीची लोखंडी चॉपर बाळगून दहशत
जळगाव : हद्दपाार असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत लोखंडी चॉपर बाळगून दहशत निर्माण करणार्या गुन्हेगाराच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
दिनकर चव्हाण हा चॉपरसह दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना कळताच त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. एमआयडीसी परीसरातील रामदेव बाबा मंदिर, सुप्रीम कॉलनी भागात संशयित हत्यारासह असल्याचे निष्पन्न होताच पथकाने संशयिताला शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजता ताब्यात घेतले.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी ही कारवाई केली. कॉन्स्टेबल ललित नारखेडे यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास किशोर पाटील करीत आहेत.


